महत्वाच्या बातम्या

 नागपूरमध्ये १८ व्यक्ती व ३ संस्थांना व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार : मुख्यमंत्री उपस्थित


विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने व्यसनमुक्ती क्षेत्रात मौलिक काम करीत असलेल्या व्यक्तींना व संस्थांना सन्मानित करण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सदर पुरस्कार वितरण सोहळा २५ व २६ मार्च २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, जे भोसले मार्ग, नरिमन पॉईट, मुंबई येथे ना. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, ना..एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, ना. सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, .ना.. संजय शिरसाट, मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, ना. माधुरी मिसाळ, राज्यमंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,  डॉ.हर्षवर्धन कांबळे, प्रधान सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, व  दिपा मुधोळ-मुंडे, आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे इ. मान्यवर यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. यामध्ये नागपूर विभागातील १८ व्यक्ती व ३ संस्थांना सन्मानित करण्यात येणार आहे.

यामध्ये नागपूर जिल्ह्यातील सात व्यक्ती पक्षाभान तुकाराम ढोक, एकनाथ विश्वनाथ पवार, डॉ. प्रितम भीमराव गेडाम, चरणदास बन्सी वैरागडे,  प्रेमा सुधीर लेकुरवाळे,  गौरव आळणे व एक संस्थेला  एकात्मता सामाजिक शिक्षण मंडळ, नागपूर मानेवाडा, श्रमजीवीनगर नागपूर, वर्धा जिल्ह्यातील दोन व्यक्ती  तुकारामदास ऊर्फ तुकाराम शंकरराव घोडे, संगपाल ऊर्फ निलेश सुगदेव पाटील, भडारा जिल्ह्यातील तीन व्यक्ती सुर्यभान दशरथ तांडेकर, भावेश एकनाथ कोटांगले, प्रा. युवराज दयाराम खोब्रागडे व एक संस्था राजीव ग्रामीण विकास बहुउद्दे‍शिय शैक्षणिक संस्था, पाचगाव (वरठी), ता. मोहाडी जि. भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यातील एक व्यक्ती संदीप गंगाधर कटकुटवार व एक संस्था संत गजानन महाराज प्रसारक मंडळ, सिंदेवाही, ता. सिंदेवाही जि. चंद्रपूर, तर गडचिरोली जिल्ह्यातील पाच व्यक्ती  मनोहर माधवराव हेपट,  केशव रामधन चव्हाण, सुर्यप्रकाश सरस्वती गजानन गभने, विजय श्रीरंग शेंडे,  तुळशीराम तुलाराम उंदीरवाडे यांची निवड करण्यात आलेली आहे.

व्यसनमुक्ती क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या समाजासमोर आदर्श ठरलेल्या व्यक्ती व संस्थांना व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार देयाची योजना शासनाने सन १९९८-९९ वर्षापासून सुरु केलेली आहे. सन २०२०-२०२१, सन २०२१-२०२२, सन २०२२-२०२३, सन २०२३-२०२४ व सन २०२४-२०२५ या पाच वर्षाकरीता राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारासाठी व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांची निवड शासनाद्वारे करण्यात आलेली आहे.  

पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या सर्व व्यक्तींचे व संस्थांचे प्रसाद कुळकर्णी, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग नागपूर यांनी अभिनंदन केले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos