महत्वाच्या बातम्या

 भिवापूर येथे २४ मार्चला रोजगार मेळावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करीअर सेंटर, नागपूर व भिवापूर महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने २४ मार्च रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन भिवापूर महाविद्यालय येथे करण्यात आलेले आहे.

या रोजगार मेळाव्यामध्ये द युनिव्हर्सल ग्रुप ऑफ असोसिएट, ऐआय इंस्ट्रयुमेंटस्, स्टॉप कँसर मिशन मल्टीपरपोझ सोसायटी, सनसुर सृष्टी इंडिया लि, स्वातंत्र मॉयक्रोफीन इत्यादी कंपन्या मार्फत ५०० पेक्षा जास्त जागांसाठी दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, डिप्लोमा इत्यादी पात्रताधारक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेवून उमेदवारांची प्राथमिक निवड केली जाणार आहे. 

याव्दारे जिल्हयातील उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. जास्तीत - जास्त उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यामध्ये उपस्थित राहून रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos