महत्वाच्या बातम्या

 देऊळगावात २१ मार्चपासून देऊळगांव चषक रात्रकालीन क्रिकेट स्पर्धा


- युवा क्रिकेट क्लबचे आयोजन; एक गाव, एक संघ नियमामुळे स्पर्धेकडे लक्ष

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : ग्रामीण भागातील युवा खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देत क्रीडा संस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशाने युवा क्रिकेट क्लब, देऊळगांव यांच्या वतीने भव्य देऊळगांव चषक रात्रकालीन हॉप पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, २१ मार्चपासून स्पर्धेला सुरुवात होत असून परिसरातील क्रीडाप्रेमींमध्ये याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे एक गाव, एक संघ हा नियम काटेकोरपणे लागू करण्यात येणार असून ग्रामीण व शहरी भागातील संघांना समान संधी दिली जाणार आहे. त्यामुळे स्पर्धेला अधिक स्पर्धात्मक स्वरूप प्राप्त होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश शुल्क ९०१ रुपये ठेवण्यात आले असून, खेळातील पारदर्शकता राखण्यासाठी २,००१ रुपयांची ऑब्जेक्शन फी निश्चित करण्यात आली आहे.

विजेत्या संघांसाठी आकर्षक रोख पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे. प्रथम क्रमांकासाठी ३१,००१ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी २१,००१ रुपये, तृतीय क्रमांकासाठी ११,००१ रुपये तर देऊळगाव ग्रामस्थांच्या प्रोत्साहनार्थ चतुर्थ क्रमांकासाठी ५,००१ रुपयांचे विशेष पारितोषिक ठेवण्यात आले आहे.

स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार असून, परिसरातील क्रीडारसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रात्रकालीन सामन्यांचा आनंद घ्यावा, असे आवाहन युवा क्रिकेट क्लब, देऊळगांव यांच्या वतीने करण्यात आले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos