महत्वाच्या बातम्या

 भरधाव दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : खापरखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत भरधाव दुचाकीने धडक दिल्यामुळे एका ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. हा अपघात शुक्रवारी १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजताच्या सुमारास घडला.

अपघातात मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव श्रीकृष्ण बालाजी ढोके (वय ६८, रा. माधवानी ले-आऊट, भानेगाव, खापरखेडा) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकृष्ण ढोके हे शुक्रवारी सायंकाळी घराजवळील एक कार्यक्रम आटोपून पायदळ घरी परतत होते.

ते रस्ता ओलांडत असताना दुचाकी क्रमांक एम.एच. ३१ डी.जी. ६२७१ च्या चालकाने दुचाकी अतिवेगात व निष्काळजीपणे चालवत त्यांना मागून जोरदार धडक दिली. या धडकेत श्रीकृष्ण ढोके गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद खापरखेडा पोलिसांनी केली असून संबंधित दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos