महत्वाच्या बातम्या

 भंडारा : पवनी-निलज मार्गावर दुचाकी-टिप्पर अपघात, दोन तरुण गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : पवनी-निलज मार्गावरील तहसील फाट्याजवळ गुरुवारी सकाळी एक अपघात घडला. जितेंद्र कुंभले हे मुरूम खाली करण्यासाठी आपल्या टिप्परने वळण घेत असताना, भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने टिप्परच्या पुढील चाकाला जोरदार धडक दिली.

या अपघातात दुचाकी चालक रितेश धगडे (२०) आणि त्याच्या मागे बसलेला एक तरुण गंभीर जखमी झाला. दोन्ही जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून, अपघाताची अधिक तपासणी सुरू केली आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos