महत्वाच्या बातम्या

 माजरी - भद्रावती मार्गाच्या कडेला मृतावस्थेत आढळली वाघीण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी-भद्रावती मार्गाच्या कडेला वाघीण मृतावस्थेत आढळली आहे. माजरी- वणी रेल्वेमार्गाच्या ५० मीटर अंतरावर वाघिणीचा मृतदेह आढळला आहे. स्थानिक शेतकरी देवराव पाटेकर यांच्या शेतात मृत वाघीण आढळल्यावर वनविभागाला माहिती देण्यात आली.

वनपथकाने घटनास्थळी पोहोचून पंचनामा कारवाई सुरू केली आहे. या वाघिणीचे काही बछडे आहेत का? याविषयी माहिती घेतली जात आहे. हा अपघात की घातपात यादृष्टीने देखील तपास केला जात आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos