रावणवाडी परिसरात अपघात : कन्हारटोला येथील व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू


विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : तालुक्यातील कन्हारटोला (काटी) येथील रहिवासी सुखचंद गोपी मात्रे (वय ४७) यांचा रावणवाडी परिसरात अपघात झाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना १२ फेब्रुवारी रोजी घडली असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, रावणवाडी परिसरात झालेल्या अपघातात सुखचंद मात्रे हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. सायंकाळी सुमारे ६.३० वाजता रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. मोनल अग्रवाल यांनी तपासणी केली असता त्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे.
News - Gondia




Petrol Price




