नागपूर : काँग्रेस नगरसेविकेच्या पतीसह १५ आरोपींविरोधात मकोका कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : प्रभाग ११ येथील काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेविका मंजू चाचेरकर यांच्या पती गणेश चाचेरकरसह १५ आरोपींविरोधात मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. १४ जानेवारी २०२६ रोजी माजी नगरसेवक भूषण शिंगणे यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले होते. या हल्ल्याच्या चौकशीअंतर्गत पोलिस उपायुक्त नित्यानंद झा यांनी मकोका कारवाई करण्याची शिफारस केली होती, जी मंजूर करण्यात आली.
हल्ल्यात आरोपींनी ९० ते १०० लोकांसोबत मिळून शिंगणे यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला, तसेच त्यांचा फोन हिसकावला. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींविरोधात तात्काळ कारवाई करण्यात आली होती, ज्यामध्ये गणेश चाचेरकरसह मंगेश मांग, नितेश बगडे, अमित मेश्राम आणि इतर आरोपींना अटक करण्यात आली.
आता शहरातील इतर गँगविरोधात पोलिस ठोस कारवाई केव्हा करतील, असा प्रश्न उपस्थित होतो.
घटनाचक्र -
१४ जानेवारी : भूषण शिंगणे यांच्यावर हल्ला
१५ जानेवारी : आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल, मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांची शिंगणे यांना भेट
१६ जानेवारी : शिंगणे यांचा पराभव, मंजू चाचेरकर यांचा विजय
२७ जानेवारी : दोन आठवड्यांच्या आत सर्व आरोपींवर मकोकाची कारवाई
पोलिस विभागाने मकोकाअंतर्गत कठोर कारवाई सुरू केली असली तरी, इतर गँगविरोधात ठोस कारवाईची आवश्यकता आहे, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
News - Nagpur




Petrol Price




