महत्वाच्या बातम्या

 नेपाळमध्ये सिंहदरबार उद्ध्वस्त : नवे पंतप्रधानांसाठी जागेचा शोध सुरू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / काठमांडू : नेपाळमध्ये जेन-झी व इतर आंदोलकांनी राजधानीतील सिंहदरबार या मुख्य सरकारी संकुलात मोठ्या प्रमाणावर तोडफोड आणि जाळपोळ केली. पंतप्रधान कार्यालय, मंत्रिमंडळ विभाग तसेच महत्त्वाची मंत्रालये जळून खाक झाली असून प्रशासनासाठी मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

मुख्य सचिव नारायण अर्याल यांनी घटनास्थळी पाहणी करून पंतप्रधान कार्यालय पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे स्पष्ट केले. याशिवाय शिक्षण, गृह आणि भौतिक पायाभूत सुविधा मंत्रालयांनाही गंभीर नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

सरकारने काही मंत्रालयांना तात्पुरत्या ठिकाणी हलविण्याची योजना आखली आहे. गृह मंत्रालय नवीन इमारतीत हलविण्यात येणार असून परराष्ट्र मंत्रालयाचे स्थलांतरही विचाराधीन आहे. मात्र, नवे पंतप्रधान कुठे कार्यरत होतील याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. आंदोलनकर्त्यांच्या संमतीनंतरच अंतिम तोडगा निघणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, हंगामी पंतप्रधानांच्या नियुक्तीवर राष्ट्रपती कार्यालयात चर्चा सुरू आहे. सिंहदरबारच्या तब्बल ८० टक्के इमारती उद्ध्वस्त झाल्याने, नव्या सरकारसाठी कार्यक्षम प्रशासकीय जागा शोधणे हे मोठे आव्हान बनले आहे.





  Print






News - World




Related Photos