महत्वाच्या बातम्या

 अवैधरीत्या देशी दारुची वाहतुक करणाऱ्या आरोपीविरूद्ध स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : पो.स्टे. नरखेड अंतर्गत मोहगाव रोड नरखेड येथे ११ जानेवारी २०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, ना.ग्रा पथक यांना गुप्त माहिती मिळाली की, एक इसम अवैधरित्या गोहगाव रोड नरखेड येथे एक ज्युपिटर गोटरसायकल क्र. MH 40-CG-9621 वर देशी दारूची वाहतुक करीत आहे. 

मिळालेल्या गुप्त माहितीवरून, स्थानिक गुन्हे शाखेतील पथकाने घटनास्थळी जावुन नाकाबंदी करून ज्युपिटर मोटरसायकल क्र. MH ४०-CG-९६२१ ला थांबवून चेक केले असता आरोपी देवेंद्र नामदेवराव कावडकर (२९), रा. तिष्टी बु त. कळमेश्वर, जि. नागपूर हा विनापरवाना व अवैधरीत्या देशी दारूची वाहतुक करतांना मिळून आल्याने आरोपीकडून ९२ देशी दारू निषा १८० एम. एल प्रमाणे प्रत्येकी ७० रु. प्रमाणे असा एकूण ६ हजार ४४० रु. व एक ज्युपिटर मो सा. क्र. MH ४०/CG- ९६२१ किमती ४० हजार रुपये असा एकूण ४६ ४०हजार ४४० रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. 

पो.स्टे. नरखेड येथे आरोपीविरुध्द कलम ६५ (ई) (अ) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून जप्त मुद्देमाल व कागदपत्रे पुढील कायदेशीर प्रक्रियेकरीता पोलीस ठाणे नरखेड यांचे ताब्यात देण्यात आले. आरोपीला सुचनापत्रावर रिहा करण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही नागपूर ग्रमीणचे पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले याचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहायक फौजदार चंद्रशेखर मडेकर, पोलीस हवालदार प्रमोद तभाने, रणजित जाधव यांचे पथकाने केली. 





  Print






News - Nagpur




Related Photos