महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


१ सप्टेंबर महत्वाच्या घटना

१९०६ : इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इंटलेक्च्युअल प्रोपर्टी अॅटॉर्नीची स्थापना झाली.

१९११ : पं. भास्करबुवा बखले यांनी पुण्यात भारत गायन समाजाची स्थापना केली.

१९१४ : रशियातील सेंट पीट्सबर्ग शहराचे नाव बदलुन पेट्रोग्राड करण्यात आले.

१९२३ : टोक्यो आणि योकोहामा परिसरात भूकंप १,०५,००० ठार.

१९३९ : जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले. या घटनेमुळे दुसर्‍या महायुद्धाची सुरुवात झाली.

१९५१: अर्नेस्ट हेमिंग्वेयांची द ओल्ड मॅन अॅन्ड द सी ही कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक व पुलित्झर पुरस्कार मिळाले.

१९५६ : भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC of India) स्थापना.

१९६९ : लिबीयात उठाव- हुकूमशहा मुअम्मर गडाफी सत्तेवर आला.

१९७२ : अमेरिकेच्या बॉबी फिशरने रशियाच्या बोरिस स्पास्कीला बुद्धीबळात पराभूत केले व जगज्जेता बनला.

१९७९ : पायोनियर- ११ अंतराळयान शनीपासून २१,००० किमी अंतरावरुन गेले.

१९८५ : संयुक्त अमेरिकन-फ्रेंच मोहिमेमुळे बुडालेले आरएमएस टायटॅनिक सापडले.

१९९१ : उझबेकिस्तान सोविएत युनियनपासुन स्वतंत्र झाला.

१९६१ : NCERT स्थापना

२०२२ : सप्टेंबरमधील सर्वाधिक तापमान - फर्नेस क्रीक, कॅलिफोर्निया, अमेरिका येथे १२७ °F (५३°C) तापमानाची नोंद झाली आहे, सप्टेंबर महिन्यातील ही जगातील इतिहासात सर्वात जास्त तापमान नोंद आहे.

२०२२ : श्रीलंका आर्थिक आणीबाणी - आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने श्रीलंकेसाठी $२.९ अब्ज अमेरिकन डॉलर्सची तात्पुरती मदत करण्यास मान्यता दिली.

१ सप्टेंबर जन्म

१७९५ : न्यूयॉर्क हेरॉल्ड चे संस्थापक जेम्स गॉर्डन बेनेट सीनियर यांचा जन्म. (मृत्यू: १ जुन १८७२)

१८१८ : कोस्टा रिका देशाचे पहिले राष्ट्रपती जोस मारिया कॅस्ट्रो माद्रीझ यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १८९२)

१८९५ : मानव-सक्षम विमानांचे निर्मिते एंगलबर्ट जशचा यांचा जन्म. (मृत्यू: २६ जून १९५५)

१८९६ : हरेकृष्ण पंथाचे संस्थापक अभय चरणारविंद भक्तिवेदांत तथा स्वामी प्रभूपाद यांचा जन्म. (मृत्यू: १४ नोव्हेंबर १९७७)

१९०८ : हिन्दी चित्रपटांतील गाजलेले खलनायक के. एन. सिंग यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी २०००)

१९१५ : ऊर्दू कथाकार आणि हिन्दी पटकथालेखक राजिंदरसिंग बेदी यांचा जन्म.

१९२१ : यष्टीरक्षक व फलंदाज माधव मंत्री यांचा जन्म.

१९३०: भारतीय आर्किटेक्ट चार्ल्स कोरिया यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून २०१५)

१९३१ : भारतीय शास्त्रज्ञ आणि विद्वान अब्दुल हक अन्सारी यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑक्टोबर २०१२)

१९४६ : दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष रोह मू-ह्युन यांचा जन्म.

१९४९ : लोकसभेचे सभापती आणि मेघालयचे मुख्यमंत्री पी. ए. संगमा यांचा जन्म.

१९७०: भारतीय-अमेरिकन अभिनेत्री आणि लेखक पद्मा लक्ष्मी यांचा जन्म.

१९३३ : श्रीलंकेचे वकील आणि राजकारणी टी. तिरुनावुकारासू (मृत्यू : १ ऑगस्ट १९८२)

१९२६ : भारतीय लेखक विजयदन देठा यांचा जन्म (मृत्यू : १० नोव्हेंबर २०१३)

१ सप्टेंबर मृत्यू

१५८१ : शिखांचे चौथे गुरू गुरू राम दास यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १५३४)

१७१५ : फ्रान्सचा राजा लुई (१४वा) यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर १६३८)

१८९३ : प्राच्यविद्या संशोधक, न्यायमूर्ती, कायदेपंडीत, समाजसुधारक, अखिल भारतीय काँग्रेसचे एक संस्थापक, काँग्रेसचे चिटणीस, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १८५०)

२००८ : बाटा शू कंपनीचे संस्थापक थॉमस जे. बाटा यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १९१४)

२०१४ : स्पॅनडेक्स चे निर्माते योसेफ शेव्हर्स यांचे निधन. (जन्म: २९ नोव्हेंबर १९३०)

२०२२ : भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि महिला हक्क कार्यकर्त्या मेरी रॉय यांचे निधन

२०२० : पोलिश स्पीडवे रायडर, विश्वविजेते जेर्झी स्काझाकिएल यांचे निधन (जन्म: २८ जानेवारी १९४९)

२०२० : भारतीय क्रिकेटपटू शेखर गवळी यांचे निधन (जन्म: ६ ऑगस्ट १९७५)

१९७६ : इंग्रज व्यावसायिक, रात्री रस्त्यावर चमकणाऱ्या प्रतिबिंबित होणाऱ्या स्टिकर (reflective road stud or cats eye)चे निर्माते पर्सी शॉ यांचे निधन (जन्म: १५ एप्रिल १८९०)

१९६१ : फिन्निश-अमेरिकन आर्किटेक्ट, गेटवे आर्कचे रचनाकार इरो सारीनें यांचे निधन (जन्म: २० ऑगस्ट १९१०)





  Print






Related Photos