महत्वाच्या बातम्या

 आज कार्तिक पौर्णिमेला दिसणार वर्षातील सुपरमून : चंद्र १४ टक्के मोठा आणि ३० टक्के अधिक तेजस्वी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : आज, २४ नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने आकाशात सुपरमूनचे विलोभनीय दृश्य पाहायला मिळणार आहे. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या तुलनेने अधिक जवळ येणार असल्याने तो नेहमीच्या पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा मोठा आणि अधिक तेजस्वी दिसणार आहे.

आज रात्री चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील अंतर सुमारे ३ लाख ५९ हजार ३४६ किलोमीटर इतके राहणार आहे. सामान्यतः चंद्र पृथ्वीपासून सुमारे ४ लाख ५ हजार ५०० किलोमीटर अंतरावर असतो. मात्र, आज चंद्र पृथ्वीच्या जवळ येत असल्याने त्याचा आकार नेहमीपेक्षा सुमारे १४ टक्के मोठा, तर प्रकाशमानता ३० टक्क्यांनी अधिक जाणवणार आहे. अशा प्रकारच्या पौर्णिमेला खगोलशास्त्रीय भाषेत सुपरमून असे संबोधले जाते.

या खगोलीय घटनेचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी आज रात्री आकाश निरभ्र असताना चंद्राचे निरीक्षण करावे. ही घटना साध्या डोळ्यांनीही सहज पाहता येणार असून, दुर्बिणीतून निरीक्षण करताना योग्य फिल्टरचा वापर करावा, असे आवाहन महाराष्ट्र स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी केले आहे.





  Print






Related Photos