महत्वाच्या बातम्या

 अमरावती महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी हरणाचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : हिंगणा वनपरिक्षेत्रांतर्गत अमरावती महामार्गालगत चामुंडा एक्सप्लोझिव्ह कंपनीजवळ शनिवारी पहाटे अज्ञात वाहनाच्या धडकेत एका मादी हरणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे महामार्गावरील वन्यप्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

घटनेची माहिती वनमजूर हिरामण पाटील यांनी वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर राउंड ऑफिसर आनंद तिडके आणि नेरी बीटचे वनरक्षक मुसळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर मृत हरणीला वनविभागाच्या जागेवर नेऊन नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, अमरावती महामार्गावरून भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे वन्यप्राण्यांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे. महामार्गालगत वन्यप्राण्यांचा वावर लक्षात घेता वाहनचालकांनी वेगमर्यादेचे पालन करून सावधगिरीने वाहन चालविणे आवश्यक आहे.





  Print






Related Photos