ग्रामीण भागातील क्रीडा गुणांना प्रोत्साहन देणे आवश्यक : आमदार डॉ. मिलिंद नरोटे

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : कृष्णनगर येथे गुरुदेव स्पोर्टिंगच्या वतीने ग्रामीणस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास काही अपरिहार्य कारणास्तव उपस्थित राहता आले नसल्याने आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी आज स्पर्धास्थळी सदिच्छा भेट देऊन आयोजक, पदाधिकारी तसेच स्पर्धेत सहभागी खेळाडूंशी संवाद साधला.
यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी खेळाडूंचे कौतुक करत त्यांना पुढील सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रीडा गुणवत्ता असून, अशा स्पर्धांच्या माध्यमातून त्यांना आपले कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होते. ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या क्रीडा कौशल्याला योग्य दिशा देण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार डॉ मिलिंद नरोटे, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष भास्करजी बुरे, रितेशजी पालरपवार, युवानेते भाविकजी आभारे, बूथ प्रमुख प्रतापजी ढाली, मनोहरजी बामणकर, नानुजी उपाध्याय, मंडळाचे रजनीकांतजी बाला, अभिजितजी गाईन, मधुजी सेन, नितेश बैरागी, रोहित गाईन, सुमंत दास, सुमितजी मिस्त्री तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्व सहभागी संघ व खेळाडूंना आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.




Petrol Price




