महत्वाच्या बातम्या

 दिल्लीतील  चिंतन बैठकीत माजी खासदार डॉ. अशोक नेते यांची प्रमुख उपस्थिती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंथा / नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज १९ नोव्हेंबर २०२६ रोजी नई दिल्ली येथील भाजपा केंद्रीय कार्यालय विस्तार येथे आयोजित करण्यात आलेल्या जनजातीय चिंतन बैठकीस माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. नितीन नबीनजी यांचे आगमनप्रसंगी डॉ. अशोकजी नेते यांनी स्वागत व अभिनंदन केले.

यावेळी भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा. नितीन नबीनजी, भाजपा राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोषजी,केंद्रीय संसदीय कार्यमंत्री तथा अल्पसंख्याक कार्यमंत्री किरेन रिजिजूजी, केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवालजी, केंद्रीय आदिवासी कार्यमंत्री जुएल ओरामजी, खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मन्नालाल रावतजी, राष्ट्रीय संघटन मंत्री व्ही. सतीशजी ,राष्ट्रीय महामंत्री गजेंद्र पटेलजी, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते, पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीच्या माध्यमातून जनजातीय समाजाच्या सर्वांगीण विकासासंदर्भातील विविध विषय, सामाजिक प्रश्न, संघटनात्मक बाबी तसेच जनजातीय समाजाच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांवर चिंतन व विचारमंथन करण्यात आले. या महत्त्वपूर्ण बैठकीतील डॉ. अशोकजी नेते यांची उपस्थिती जनजातीय समाजाच्या प्रश्नांप्रती असलेली त्यांची बांधिलकी आणि पक्षसंघटनेतील सक्रिय योगदान अधोरेखित करणारी ठरली.





  Print






Related Photos