महत्वाच्या बातम्या

 गडचांदूर पोलिसांची गांजाविरोधात कारवाई : १ किलो ९३ ग्रॅम गांजासह एकाला अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : गुप्त माहितीच्या आधारे गडचांदूर पोलिसांनी अमली पदार्थविरोधी कारवाई करत १ किलो ९३ ग्रॅम गांजा जप्त केला. या कारवाईत जंगू मारोती कुंभरे (वय ५१), रा. बैलमपूर, ता. राजुरा, जि. चंद्रपूर याला अटक करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे किंमत ५४ हजार ६५० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई २७ ऑक्टोबर रोजी करण्यात आली.

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी गडचांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५०८/२०२६ नुसार अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या कलम ८(क) व २०(ब)(II)(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडून गांजा जप्त करून त्याला ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास गडचांदूर पोलीस करीत आहेत.

सदर कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि राजुरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बनबले यांच्या पोलीस उपनिरीक्षक पंकज हेकाड, पोलीस अंमलदार बलवंत शर्मा, सुरज ढोले, प्रकाश बाजगीर, साईनाथ उपरे, मनोहर जाधव, पराग राजूरकर आणि महिला पोलीस अंमलदार कविता पळनाटे यांचा समावेश होता.





  Print






Related Photos