महत्वाच्या बातम्या

 रेल्वे गाडीखाली आल्याने तरुणाचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बामणी येथील ४० वर्षीय तरुणाचा रेल्वे गाडीखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना २३ सप्टेंबर रोजी पेपर मिलजवळील रेल्वे पटरीवर घडली. जीवन हरिदास मानकर असे मृतकाचे नाव आहे. जीवन मानकर हा मजुरीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. २३ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास तो घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर पेपर मिलजवळील रेल्वे पटरीवर तो रेल्वे गाडीखाली आल्याने गंभीर जखमी झाला. या घटनेत त्याचा मृत्यू झाला.

जीवन याला दारूचे व्यसन होते. त्यामुळे त्याला पोटदुखीचा त्रास होत असल्याची माहिती आहे. या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्येचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मदन दिवटे पुढील तपास करीत आहेत.





  Print






Related Photos