माझ गाव आरोग्य संपन्न गाव विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : माझ गाव, आरोग्य संपन्न गाव अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांच्या प्रमुख उपस्थित जिल्हास्तरीय कार्यशाळचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेला माझ गाव आरोग्य संपन्न अभियानाच्या नागपूर मंडळाच्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट रिसोर्स पर्सन राज्यस्तरीय प्रतिनिधी सविता गजभिये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील बेले, शिक्षणाधिकारी प्राथमिक सीमा पाटील, शिक्षणाधिकारी माध्यमिक जयश्री राऊत, शिक्षणाधिकारी नियोजन चंद्रकांत चिलवते, जिल्हा माता व बाल संगोपण अधिकारी डॉ. मंगेश रेवतकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नलिनी विखे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ.संदिप नखाते, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.प्रशांत वाडिभस्मे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी आम्रपाली मोरे, जिल्हा मूल्यमापन व संनियंत्रण अधिकारी स्मिता वासनिक तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
गावातील प्रत्येक कुटूंबापर्यंत आरोग्य सेवा व आरोग्यविषयक जनजागृती करुन आरोग्य संपन्न गाव घडविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने व लोकसहभागातून कार्य करण्याचे आवाहन पराग सोमण यांनी केले.
कार्यशाळेस सविता गजभिये यांनी गावपातळीवर आरोग्यदायी वातावरण निर्मिती, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा, स्वच्छता, पोषण, माता बाल आरोग्य, असंसर्गजन्य आजारांची तपासणी, आरोग्य जनजागृती आणि लोकसहभाग याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत जिल्ह्यातील सर्व सीडीपीओ, तालुका आरोग्य अधिकारी, गट विकास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, सेविका, सीएचओ, गटप्रवर्तक व ग्रामपंचायत अधिकारी सहभागी झाले होते, असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे.




Petrol Price




