महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


१२ सप्टेंबर महत्वाच्या घटना

१६६६ : आग्ऱ्याहून सुटका, शिवाजी महाराज राजगड येथे सुखरूप पोहोचले.Astronomy

१८५७ : कॅलिफोर्निया गोल्ड रश मध्ये सापडलेले १३-१५ टन सोने घेऊन जाणारे एस.एस. सेंट्रल अमेरिका हे जहाज सोने व ४२६ प्रवाशांसह बुडाले.

१८९७ : तिरह मोहिम: सारगढीची लढाई.

१९१९ : अ‍ॅडॉल्फ हिटलर यांनी जर्मन वर्कर्स पार्टी मध्ये प्रवेश केला.

१९३० : विल्फ्रेड र्‍होड्स यांनी आपला शेवटचा म्हणजे १११० वा प्रथमश्रेणी क्रिकेट सामना खेळला.

१९४८ : भारतीय सैन्य हैदराबाद संस्थानच्या हद्दीत शिरले. हैदराबाद मुक्तिसंग्रामास पोलिस अ‍ॅक्शन असे म्हटले जाते.

१९५९ : ल्युना-२ हे मानवविरहित रशियन यान चंद्रावर उतरले.

१९८० : तुर्कस्तानमध्ये लष्करी उठाव.Geographic Reference

१९९८ : डॉ. जयंत नारळीकर यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान.

२००२ : मेटसॅट या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण.

२००५ : हाँगकाँगमधील डिस्नेलँड सुरू झाले.

२०११ : न्यूयॉर्क शहरातील ९/११ मधील स्मारक संग्रहालय सर्वांसाठी सुरु झाले.

२०२२ : जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप - ओरियन नक्षत्रात असलेल्या ओरियन नेब्युलाचे पहिले फोटो प्रकशित केले.

२०१३ : व्हॉयेजर १ प्रोब - नासाचे व्हॉयेजर १ प्रोब हे आंतरतारकीय अवकाशात प्रवेश करणारी पहिली मानवनिर्मित वस्तू बनली असे घोषित केले.

१९९२ : स्पेस शटल एंडेव्हर - प्रक्षेपित केले. नासाचे हे ५०वे शटल मिशन चिन्हांकित आहे.

१९९२: में कॅरोल जेमिसन - अंतराळात जाणाऱ्या पहिल्या आफ्रिकन-अमेरिकन महिला बनल्या

१९९२ : मामोरू मोहरी हे अमेरिकन स्पेसशिपमध्ये उड्डाण करणारे पहिले जपानी नागरिक बनले

१९९२ : स्पेस शटल एंडेव्हर - मार्क ली आणि जॅन डेव्हिस हे अंतराळात जाणारे पहिली विवाहित जोडी बनले.

१९६६ : मिथुन ११ - नासाच्या जेमिनी कार्यक्रमाचे अंतिम मिशन

१९६२ : जॉन एफ. केनेडी - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, यांनी आम्ही चंद्रावर जाणे निवडले (We choose to go to the Moon) भाषण दिले.

१९६१ : आफ्रिकन आणि मालागासी युनियन (AMU) - स्थापना झाली.

१९५८ : जॅक किल्बी - यांनी टेक्सास इन्स्ट्रुमेंट्समध्ये काम करताना प्रथम कार्यरत इंटिग्रेटेड सर्किटचे प्रात्यक्षिक केले.

१९४५ : पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया - कोरियावरील जपानी राजवट संपवून कोरियाचे पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया घोषित करण्यात आले.

१९४३ : दुसरे महायुद्ध - बेनिटो मुसोलिनी यांची जर्मन कमांडो सैन्याने नजरकैदेतून सुटका केली.

१९४२ : दुसरे महायुद्ध - एडसन रिजची लढाई: ग्वाडालकॅनल मोहिमेदरम्यान लढाईचा पहिला दिवस.

१९४८ : स्वित्झर्लंड - देशाची फेडरल राज्य म्हणून स्थापना

१२ सप्टेंबर जन्म

१४९४ : फ्रान्सचा राजा फ्रान्सिस पहिला यांचा जन्म.Time & Calendars

१६८३ : पोर्तुगालचा राजा अफोन्सो सहावा यांचा जन्म.

१७९१ : विद्युतशक्तीचे शास्रज्ञ मायकल फॅरेडे यांचा इंग्लंड येथे जन्म.

१८१८ : गॅटलिंग गन चे संशोधक रिचर्ड जॉर्डन गॅटलिंग यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १८०३)

१८९४ : जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक विभूतिभूषण बंदोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: १ नोव्हेंबर १९५०)

१८९७ : नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आयरिन क्युरी यांचा जन्म. (मृत्यू: १७ मार्च १९५६)

१९१२ : इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी फिरोझ गांधी यांचा जन्म. (मृत्यू: ८ सप्टेंबर १९६०)

१९४८ : ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि फुटबॉलपटू मॅक्स वॉकरयांचा जन्म.

१९७७ : ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू नेथन ब्रॅकेन यांचा जन्म.

१९०२ : ब्राझील देशाचे २१वे राष्ट्राध्यक्ष, चिकित्सक आणि राजकारणी ज्युसेलिनो कुबित्शेक यांचा जन्म (मृत्यू : २२ ऑगस्ट १९७६)

१८९२ : अमेरिकन प्रकाशक, अल्फ्रेड ए. नॉफ, इंक. आल्फ्रेड ए. नॉफ सीनियर यांचा जन्म (मृत्यू : ११ ऑगस्ट १९८४)

१८१२ : रोटरी-प्रकाराच्या प्रिंटिंग प्रेसचे संशोधक रिचर्ड मार्च हो यांचा जन्म (मृत्यू : ७ जून १८८६)Astronomy

१२ सप्टेंबर मृत्यू

१९१८ : ऑस्ट्रेलियाचे चौथे पंतप्रधान जॉर्ज रीड यांचे निधन.

१९२६ : मराठी साहित्य संशोधक, ग्रंथकार विनायक लक्ष्मण भावे यांचे निधन.

१९५२ : शास्त्रीय गायक रामचंद्र कुंदगोळकर तथा सवाई गंधर्व यांचेनिधन. (जन्म: १९ जानेवारी १८८६)

१९७१: शंकर-जयकिशन या संगीतकार जोडीतील संगीतकार जयकिशन डाह्याभाई पांचाळ यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १९२९)

१९८० : चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते सतीश दुभाषी यांचे निधन. (जन्म: १४ डिसेंबर १९३९)

१९८० : चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री शांता जोग यांचे निधन. (जन्म: २ मार्च १९२५)

१९९२ : हिंदुस्तानी शास्त्रीय गायक पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांचे निधन. (जन्म: ३१ डिसेंबर १९१०)

१९९३ : अमेरिकन अभिनेता रेमंड बर यांचे निधन.

१९९६ : संगीत नाट्य सृष्टीतील गायक अभिनेते पं. कृष्णराव चोणकर यांचेनिधन.

१९९६ : चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचे निधन. (जन्म: ७ जुलै १९४८)

१९९६ : ब्राझील देशाचे २९वे राष्ट्राध्यक्ष, जनरल आणि राजकारणी अर्नेस्टो गिझेल यांचे निधन (जन्म: ३ ऑगस्ट १९०७)

१९६२ : भारतीय लेखक आणि नाटककार रंगेया राघव यांचे निधन (जन्म: १७ जानेवारी १९२३)Geographic Reference

१९४२ : मार्टिन बेकर एरिक कंपनीचे सहसंस्थापक वेलेंटाइन बेकर यांचे निधन (जन्म: २४ ऑगस्ट १८८८)

१८७४ : फ्रेंच इतिहासकार आणि राजकारणी, फ्रान्स देशाचे २२वे पंतप्रधान फ्रँकोइस गुइझोट यांचे निधन (जन्म: ४ ऑक्टोबर १७८७)





  Print






Related Photos