महत्वाच्या बातम्या

 स्वाधार योजनेच्या लाभासाठी ३० ऑक्टोंबर पर्यंत मुदतवाढ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतू शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या व प्रवेश न घेतलेल्या इयत्ता ११ वी, १२ वी तसेच नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्यास ३० ऑक्टोंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात  आली आहे.

सन २०२५-२०२६ या वर्षात स्वाधार योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांना सन २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षाकरीता ऑनलाईन अर्ज नुतणीकरण करण्याकरीता १५ सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. सर्व प्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरीता अर्ज करावयाच्या पुर्वी शासकीय वसतीगृह प्रवेश प्रक्रियेत सहभाग घेणे आवश्यक आहे.

स्वाधार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना वसतीगृहातील मुलां-मुलीप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य व इतर आवश्यक सुविधा स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे, असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांनी कळविले आहे.





  Print






Related Photos