माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज आत्राम यांच्याकडून आजारग्रस्ताला आर्थिक मदत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / अहेरी : तालुक्यातील अतिदुर्गम गाव किष्टापूर दौड या गावातील सुरेश वागा मडावी या व्यक्तीची मागील काही दिवसापासून प्रकृती ठीक नसल्याने अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. अहेरी येथे उपचार होत नसल्याने तेथून गडचिरोलीला रेफर करण्यात आले. याविषयी सामाजिक कार्यकर्ते विकास तोडसाम यांना माहिती मिळतातच सदर बाब माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज आत्राम यांना माहिती दिले. महाराजांना माहिती होताच ५ हजार रुपयाची तात्काळ आर्थिक मदत पाठविले तसेच रुग्णवाहिकाची व्यवस्था करून दिले. विशेष म्हणजे डिसेंबर महिन्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचारादरम्यान मौजा कीष्टापूर दौड येथील स्थानिकांना महाराजांनी शब्द दिले होते की, तुम्हाला कुठल्याही समस्या आल्यास मला संपर्क करा. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे आणि आज महाराजांनी दिलेले वचन पूर्ण केले.
News - Gadchiroli