महत्वाच्या बातम्या

 तेलंगणातून राजुऱ्यात गांजा तस्करीचा प्रयत्न राजुरा पोलीसांनी उथळला : दोन आरोपी ताब्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : तेलंगणातून राजुरा येथे गांजाची वाहतूक करणाऱ्या अशोक नागच्या माचां २५ वर्ष रा. गुंडीरोड, वसनापूर, आसिफाबाद आणि विष्णू महेश नागापुरी २० वर्ष रा. टी.आर. नगर, चैतन्या कॉलेजजवळ, आसिफाबाद, या दोघांना राजुरा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ९५० ग्रॅम गांजासदृश्य अंमली पदार्थ, दुचाकी व बॅग असा एकूण १ लाख ३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ८ ऑगस्ट रोजी करण्यात आली.

राजुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गांजाची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नाकाबंदी करून टीएस २० सी ११०९ क्रमांकाच्या हिरो एचएफ डिलक्स दुचाकीची तपासणी केली. यावेळी दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोघांच्या बॅगेची झडती घेतली असता, हिरव्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीत खाकी रंगाच्या सेलोटेपने गुंडाळलेला गांजासदृश्य अंमली पदार्थ आढळून आला.

जप्त करण्यात आलेल्या पदार्थाचे वजन ९५० ग्रॅम असून त्याची अंदाजे किंमत १८ हजार रुपये आहे. याशिवाय गांजा ठेवण्यासाठी वापरलेली मोरपंखी रंगाची बॅग, किंमत ५०० रुपये, तसेच गांजाच्या वाहतुकीसाठी वापरलेली हिरो एचएफ डिलक्स दुचाकी, किंमत ८५ हजार रुपये, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध राजुरा पोलीस ठाण्यात अप. क्र. ६६३/२०२६, कलम ८(क), २०(ब), २२(ब) एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण लोकरे, पोलीस उपनिरीक्षक राठोड, सफौ किशोर तुमराम, पोलीस हवालदार विक्की निर्वाण, अनुप डांगे, पोलीस अंमलदार महेश बोलगोडवार, शफीक शेख, मिलिंद जांभुळे, रमेश बस्सी व राजीव दुबे यांनी केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos