सार्वजनिक विहिरीत पडून महिलेचा मृत्यू

- जैतपूर येथील दुर्दैवी घटना; शेवाळावरून पाय घसरल्याने पाण्यात बुडाल्याची माहिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : तालुक्यातील जैतपूर येथे सार्वजनिक विहिरीत पडून ३२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ६ ऑगस्ट रोजी घडली. दीक्षा विद्याधर फुल्लुके ३२ वर्षे असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे जैतपूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीक्षा फुल्लुके या मानसिक आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्यावर भंडारा येथील डॉक्टरांकडे नियमित उपचार सुरू होते. ६ ऑगस्ट रोजी त्या गावातील सार्वजनिक विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुण्यासाठी पाणी काढत असताना विहिरीजवळील शेवाळावरून अचानक त्यांचा पाय घसरला. त्यामुळे त्यांचा तोल जाऊन त्या विहिरीत पडल्या.
विहिरीत पडल्याने त्या पाण्यात बुडाल्या आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. या घटनेमुळे फुल्लुके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी भोजराज पागोटे यांच्या तोंडी तक्रारीवरून दिघोरी पोलिस ठाण्यात मर्ग नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास हवालदार हितेश मडावी करीत आहेत.
News - Bhandara




Petrol Price




