गांजाची विक्री करणाऱ्या बापलेकाला ठोकल्या बेड्या

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : स्थानिक गुन्हे शाखेच्या अॅन्टी नार्कोटिक्स पथकाने केळझर येथे कारवाई करून गांजाची विक्री करणाऱ्या बापलेकाला रंगेहाथ अटक केली. ही कारवाई सोमवारी करण्यात आली. त्यांच्याकडून २६ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सेलू पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुखा भुजाजी धनवे व मुलगा आशीद रुखा धनवे दोघेही रा. वॉर्ड नंबर-१ गणेशनगर, केळझर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत.
रुखा धनवे हा आपल्या घरून अमली पदार्थाची विक्री करतो, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे आरोपीच्या धडक देऊन पाहणी केली असता दोघेही घरी स्थानिक गुन्हे शाखेची केळड़ार येथे कारवाई २६ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल केला जप्त बापलेक संगनमताने अमली पदार्थाची विक्री करताना रंगेहाथ सापडले. पोलिसांनी दोघांनाही अटक करून त्यांच्याकडून ५२६ ग्रॅम गांजा, रोख रक्कम व मोबाइल असा एकूण २६ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस उपनिरीक्षक सलाम कुरेशी, पोलिस अंमलदार अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवी पुरोहित, सागर भोसले यांनी केली
News - Wardha




Petrol Price




