महत्वाच्या बातम्या

 ६ ऑगस्ट रोजी निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्तीवेतन धारकांचा मेळावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हा कोषागार कार्यालय, गडचिरोली अंतर्गत निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतन/ कुटुंब निवृत्तीवेतन धारकांचा मेळावा ०६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १२ वा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह, समाजकल्याण, कॉम्पलेक्स, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी जिल्ह्यातील राज्य शासकीय निवृत्तीवेतन/ कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी सदर मेळाव्यास उपस्थित राहून आपले शंका समाधान करून घ्यावे, असे जिल्हा कोषागार अधिकारी यांनी कळविले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos