महत्वाच्या बातम्या

 नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघात १ व २ ऑगस्टला  विशेष एसआयआर शिबिरे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर १ व २ ऑगस्ट रोजी शनिवार व रविवार रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.


या शिबिरांमध्ये संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) मतदान केंद्रावर उपस्थित राहून इनुमेरेशन फार्म (EF) स्वीकारणे, त्यांची पडताळणी करणे, आवश्यक मार्गदर्शन करणे तसेच निवडणूक आयोगाने निर्धारित केलेले इतर कामकाज पार पाडणार आहेत. मतदारांनी भरलेला EF, आवश्यक कागदपत्रांसह आपल्या संबंधित मतदान केंद्रावर जमा करावा. ज्या मतदारांनी अद्याप EF भरलेला नसेल त्यांनीही संबंधित बीएलओ यांच्याशी संपर्क साधून तो भरून द्यावा.


मतदार यादी अद्ययावत, अचूक व त्रुटीरहित करण्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा असून नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी या विशेष शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उप जिल्हाधिकारी तथा ५६- नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी विवेक साळुंके नागपूर यांनी केले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos