वरोऱ्यात भर पावसात लक्षवेधी निदर्शने आंदोलन


विदर्भ न्यूज एक्सरेस
तालुका प्रतिनिधी / वरोरा : नीट परीक्षेतील कथित गैरव्यवस्थापनाची निष्पक्ष चौकशी करावी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आदी मागण्यांकरिता बुधवारला वरोरा शहरात भर पावसात वरोरा तालुक्यातील विद्यार्थी, सामाजिक, धार्मिक, व्यापारी व राजकीय संघटना च्या वतीने लक्षवेधी आंदोलन आणि निदर्शने करण्यात आले.
दिल्ली येथे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी चार्ज करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांवरील अन्यायकारक शैक्षणिक धोरणांचा निषेध करण्याकरिता स्थानिक आंबेडकर चौकामध्ये विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटना, विद्यार्थी आणि पालक मोठ्या प्रमाणात रेनकोट व छत्री घेऊन भर पावसात आंदोलन स्थळी आले. विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेतील दोषींवर ठोस कारवाई करण्यात यावी आणि शिक्षण मंत्र्यांचा त्वरित राजीनामा द्यावा याकरिता आंदोलन एकत्र आले आणि सर्व तहसील कार्यालयाकडे मार्गस्थ झाले.
शहीद योगेश डाहुले स्मारकाजवळ नीट परीक्षेदरम्यान आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली देण्यात आली. त्यानंतर नायब तहसीलदार शरद मसराम यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने पारदर्शक, न्याय आणि विद्यार्थी-केंद्रित परीक्षा व शिक्षण व्यवस्था निर्माण करावी, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ठोस व प्रभावी उपाययोजना करावी आदी मागण्यांसह जंतरमंतर दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर बळजबरीने झालेल्या अमानुष लाठीचार्जचा निषेध करण्यात आला.
आंदोलनात नगराध्यक्ष अर्चना ठाकरे, शिवसेनेचे मुकेश जीवतोडे, उभाठाचे मनीष जेठानी, प्रहार संघटनेचे किशोर डुकरे, माजी नगराध्यक्ष विलास टिपले व अहेतश्याम अली, काँग्रेसचे प्रवीण काकडे, राजेंद्र चिकटे निलेश भालेराव, मनसेचे बाळू गेडाम, संजय बोधे, छोटू शेख यांचे सह विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
News - Chandrapur




Petrol Price




