महत्वाच्या बातम्या

 गडचिरोलीत अभाविप नगर कार्यकारिणीची घोषणा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, गडचिरोली नगरच्या सत्र २०२६–२०२७ च्या नगर कार्यकारिणीची घोषणा उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. या वेळी जिल्हाप्रमुख प्रा. विकास चित्ते यांनी निर्वाचन अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली. प्रमुख वक्ते म्हणून सुमितजी बरांडे यांनी विद्यार्थी चळवळ, संघटन विस्तार आणि कार्यकर्त्यांची जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले. विभाग छात्रा प्रमुख दीक्षा पिपरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी प्रा. अनंता गावंडे यांची नवनिर्वाचित नगर अध्यक्ष दायित्वावर निवड जाहीर करण्यात आली, तर संकेत म्हस्के यांची नगर मंत्री म्हणून पुनर्निवड करण्यात आली. तसेच सत्र २०२६-२०२७ साठीच्या संपूर्ण नगर कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.

नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून आगामी काळात विद्यार्थीहित, राष्ट्रहित व संघटन बळकटीसाठी समर्पित भावनेने कार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास नगरातील अभाविपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos