महत्वाच्या बातम्या

 युवकांनी नोकरीसाठी घरापासुन दूर जाण्याची तयारी ठेवावी : पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : अनेक युवक घराजवळ नोकरीची अपेक्षा करतात, ही मानसिकता बदलण्याची गरज असून चांगल्या रोजगारांच्या संधीसाठी आवश्यक असल्यास घरापासून दूर जाऊन काम करण्याची तयारी युवकांनी ठेवावी, तसेच उद्योगांनी युवकांचा प्रामाणिकपणा व गरज लक्षात घेऊन त्यांना चांगल्या व र्दीर्घ कालीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन द्याव्या, असे आवाहन आमदार राजेश बकाने यांनी केले.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व समृध्दी औद्योगिक प्रशिक्षण संस्था देवळीच्या संयुक्त विद्यमाने जागतिक कौशल्य दिनाचे औचित्य साधून पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होत, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला नगराध्यक्ष किरण ठाकरे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त डॉ.सुधाकर झळके, पोलिस उपनिरिक्षक शिवराज जाधव, महाराष्ट्र रेडिओ सामुदायिक संघाचे अध्यक्ष अजय तिगावकर, सुरेश गणराज यांची उपस्थिती होती.

ग्रामीण भागातील युवक कोणत्याही क्षेत्रात मागे नसून, यशस्वी होण्यासाठी कौशल्य विकासाला पर्यांय नाही. युवकांनी सातत्याने नवीन कौशल्ये आत्मसात करुन रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा, असे किरण ठाकरे म्हणाले.

अजय तिगावकर यांनी स्वत:च्या संघर्षमय जीवनप्रवासाचे अनुभव कथन करत उपस्थित युवकांना प्रेरीत केले. जिद्द, परिश्रम आणि सातत्य यांच्या बळावर कोणतेही ध्येय साध्य करता येते. असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला. शिवराज जाधव यांनी सायबर गुन्हे, ऑनलाईन फसवणूक, सुरक्षित डिजिटल व्यवहार या बाबत तर सुरेश गणराज यांनी संवाद कौशल्य, भाषा कौशल्य, व्यक्तीमत्व विकास यावर मार्गदर्शन केले.

या रोजगार मेळाव्या १३ नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवून ३३२ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली. मेळाव्यास १८० उमेदावारांनी उपस्थिती दर्शविली, त्यापैकी १००७ उमेदवारांची प्राथमिक निवड तर २४ उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली.  

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधाकर झळके यांनी केले. संचलन आरजे सुहास इंगळे यांनी केले तर आभार मोरेश्वर पडोळे यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी रु. हु. ठाकूर, समृध्दी आयटीआयचे प्राचार्य मोरेश्वर पडोळे,  इन्युद्बेशन केंद्राचे समन्वयक रुपेश रामगडे यांची उपस्थितीत होते.





  Print






News - Wardha




Related Photos