महत्वाच्या बातम्या

 रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रक जप्त


विदर्भ न्युज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रक देवरी पोलिसांनी शिरपूर येथील राज्य सीमा नाक्यावर पकडला. ही कारवाई गुरुवारी १६ पहाटे ५.२५ वाजताच्या सुमारास करण्यात आली. पोलिसांनी या कारवाईत रेतीसह ट्रक असा एकूण १० लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुरुवारी पहाटे शिरपूर राज्य सीमा नाक्यावर नाकेबंदी सुरू असताना बाघनदीकडून येणारा ट्रक क्रमांक सीजी ०८-बीसी ८९९९ पोलिसांनी थांबवून तपासणी केली. यावेळी ट्रकमध्ये रेती आढळून आली.

ट्रकचालक संजय गोविंद बावनथडे ३७ वर्ष रा. बाघनदी, जि. राजनांदगाव, छत्तीसगड) याच्याकडे रेती वाहतुकीसाठी आवश्यक ट्रान्झिट पास (टी.पी.) तसेच कोणताही वैध परवाना नसल्याचे तपासात स्पष्ट झाले. चौकशीत त्याने ट्रकमधील रेती बाघनदी येथून आणल्याची माहिती दिली.

वनविभागाची परवानगी तसेच शासनाचा वैध परवाना नसताना रेतीची वाहतूक केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी दोन ब्रास रेती (किंमत १२ हजार रुपये) आणि ट्रक (किंमत १० लाख रुपये) असा एकूण १० लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





  Print






News - Gondia




Related Photos