महत्वाच्या बातम्या

 नगरपरिषद गडचिरोलीच्या आरोग्य व स्वच्छता सभापतीपदी शेखर आखाडे यांची निवड


- नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांच्याकडून अभिनंदन; शहरातील स्वच्छता व आरोग्य सेवांना मिळणार अधिक गती
 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : नगरपरिषद गडचिरोलीच्या आरोग्य व स्वच्छता सभापतीपदी शेखर आखाडे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत असून नगरपरिषदेतील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आरोग्य व स्वच्छता सभापतीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर यांनी शेखर भाऊ आखाडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात सांगितले की, शहराच्या सर्वांगीण विकासात स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. शेखर आखाडे यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली शहरातील स्वच्छता व्यवस्थेला अधिक बळ मिळेल, आरोग्य सुविधा अधिक प्रभावी होतील आणि नागरिकाभिमुख उपक्रमांना नवी गती मिळेल, असा विश्वास आहे.

नगराध्यक्षांनी पुढे सांगितले की, गडचिरोली शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी बनविण्यासाठी नगरपरिषद सातत्याने प्रयत्नशील असून आरोग्य व स्वच्छता विभागाची भूमिका त्यामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. शेखर आखाडे यांच्या कार्यकाळात शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, शेखर भाऊ आखाडे यांच्या निवडीबद्दल नगरपरिषदेतील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली शहरातील स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि नागरी सेवा अधिक परिणामकारक होतील, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला.

गडचिरोली शहराच्या स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी नव्या सभापतींकडून प्रभावी नियोजन आणि लोकाभिमुख उपक्रम राबविले जातील, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos