पंडित दीनदयाल उपाध्याय विशेष रोजगार मेळावाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : जिल्हयातील नोकरीइच्छुक युवक व युवतींकरीता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा (प्लेसमेंट ड्राईव्ह) आयोजित करून त्यांना खाजगी क्षेत्रातील नामांकित कंपन्याच्या माध्यमातून अधिक मागणी असलेल्या क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उददेशाने जागतिक कौशल्य विकास दिन निमित्य आयोजित जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा आणि बाजीराव करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसी नागझिरा रोड साकोली, जिल्हा भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने १५ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी. ३.०० या वेळेत बाजीराव करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसी नागझिरा रोड साकोली, जिल्हा भंडारा या ठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्याय विशेष रोजगार मेळावा (प्लेसमेंट ड्राईव्ह) आयोजित करण्यात आला आहे.
सदर रोजगार मेळाव्याची या कार्यालयाकडून व्यापक प्रमाणात प्रसिध्दी करण्यात येत आहे. सदर मेळाव्यात १) वैभव एंटरप्रायझेस प्रा. लि. नागपूर, २) अशोक लेलैंड प्रा. ली गडेगाव, लाखनी भंडारा, ३) सनफ्लॅग स्टील अॅड आयर्न प्रा. लि. वरठी भंडारा, ४) नुबिनो हेल्थकेअर प्रा. लि. नागपूर, ५) एसबीआय लाईफ इन्शुरन्स भंडारा, ६) महाराष्ट्र मेटल प्रा. ली मारेगाव भंडारा, ७) क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण बैंक नागपूर, ८) युनिव्हर्सल ग्रुप नागपूर ९) पटले ग्रुप नागपूर, १०) एलआयसी भंडारा / भारतीय आयुर्विमा महामंडळ भंडारा ११) उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, भंडारा, १२) फ्युजन फायनान्स लि भंडारा, १३) ऑपर्चुनिटी सॉफ्टवेअर भंडारा, १४) श्रीराम फायनान्स, भंडारा १५) इसा इंडिया (अस्पेक्ट (आय) सोशल असोसिएशन) इ. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या एकूण १५ कंपन्यांमध्ये उपलब्ध ५३५ रिक्तपदांकरिता मुलाखती घेतल्या जाणार असून त्यांचेद्वारा जिल्हयातील नोकरीइच्छुक युवक व युवतींना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
सदर मेळाव्यामध्ये मुलाखत व तत्सम प्रक्रीयेद्वारा उमेदवारांची निवड होणार असल्याने उमेदवारांनी बायोडेटा, शैक्षणिक कागदपत्राच्या छायांकित प्रती व पासपोर्ट फोटोसह मेळाव्याच्या ठिकाणी स्वखर्चाने उपस्थित राहावे. नोकरीइच्छुक युवक व युवतींनी तसेच गोसे प्रकल्पग्रस्थ उमेदवारांनी सदर रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी मेळाव्याच्या दिवशी ऑफलाईन नोंदणी करता येईल.
सदर रोजगार मेळाव्यामधील रोजगाराच्या सुवर्णसंधीचा जिल्हयातील अधिकाधीक नोकरीइच्छुक व गरजू युवक व युवतींनी तसेच, गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त गावातील नोकरीईच्छुक उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवुन रोजगाराच्या संधीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन सुनंदा बजाज, सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा यांनी केले आहे. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयाच्या ०७१८४-२५२२५० या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष भेट देण्यात यावी.
News - Bhandara




Petrol Price




