रेगडी–हडदवाही जि.प. क्षेत्रातील बूथप्रमुखांचे BLA-२ व SIR प्रशिक्षण गोविंदपूर येथे संपन्न


- BLA-२ नियुक्ती, मतदार नोंदणी आणि SIR अभियान यशस्वी करण्याचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : रेगडी–हडदवाही जिल्हा परिषद क्षेत्रातील बूथप्रमुख व पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित BLA-२ व SIR प्रशिक्षण वर्ग गोविंदपूर येथील हॉटेल व्हिला अर्बनच्या सभागृहात उत्साहात पार पडला. भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित या प्रशिक्षण वर्गात मतदार यादी विशेष पुनरिक्षण (SIR) अभियान प्रभावीपणे राबविणे, BLA-२ ची नियुक्ती, मतदार नोंदणी प्रक्रिया तसेच संघटनात्मक जबाबदाऱ्या याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षण वर्गात भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, ज्येष्ठ नेते भारत खटी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास पाटील भांडेकर, युवा मोर्चा जिल्हा महामंत्री आकाश सातपुते, मोरेश्वर भांडेकर, घोट मंडळ अध्यक्ष राकेश सरकार तसेच गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे SIR प्रमुख हरीश माकडे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी मार्गदर्शन करताना वक्त्यांनी सांगितले की, ३० जून ते २८ जुलै या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या SIR अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक मतदान केंद्रावर BLA-२ ची नियुक्ती करणे, शासकीय BLO यांच्या समन्वयाने मतदार नोंदणी अर्जांचे वितरण व संकलन करणे, पात्र नागरिकांची मतदार म्हणून नोंदणी सुनिश्चित करणे तसेच संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि प्रभावीपणे राबविणे ही प्रत्येक बूथप्रमुखाची महत्त्वाची जबाबदारी आहे.
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांनी सर्व बूथप्रमुख व पदाधिकाऱ्यांना BLA-२ आणि SIR अभियानाशी संबंधित सर्व कामे वेळेत व जबाबदारीने पूर्ण करण्याचे आवाहन केले. त्यांनी मतदार नोंदणी अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय सहभाग नोंदविण्याची गरजही व्यक्त केली.
प्रशिक्षणात पदाधिकाऱ्यांचे ऑनलाइन प्रशिक्षण पूर्ण करणे, मतदार यादी अद्ययावत ठेवणे, नवमतदारांची नोंदणी, पात्र नागरिकांना मतदान प्रक्रियेशी जोडणे आणि बूथस्तरावरील संघटनात्मक कार्य अधिक प्रभावी करण्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
या प्रशिक्षण कार्यक्रमास रेगडी–हडदवाही पंचायत समिती क्षेत्र प्रमुख विनोद किरमे, पलाश घरामी, राजू सातपुते, संदीप भोवरे, सुमेन विश्वास, सोम वैद्य, तारक हलदार, महेश विश्वास तसेच जिल्हा परिषद क्षेत्रातील सर्व बूथप्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
News - Gadchiroli




Petrol Price




