महत्वाच्या बातम्या

 तीन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा अखेर शोध : एएचटीयू व एलसीबी ची कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : तीन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा अखेर शोध लावण्यात चंद्रपूरच्या मानव तस्करी प्रतिबंधक कक्ष एएचटीयू आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या एलसीबी पथकाला यश आले आहे. मुलीला सुरक्षित ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी गडचांदूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

गडचांदूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७(२) व १४३ अन्वये गुन्हा दाखल असून या प्रकरणाचा तपास सुरू होता. तपासादरम्यान संबंधित अल्पवयीन मुलगी हैदराबाद येथे नोकरी करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. 

या माहितीच्या आधारे मानव तस्करी प्रतिबंधक कक्ष व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुलीशी संपर्क साधला. त्यानंतर गुरुवार, ९ जुलै रोजी तिला तिच्या राहत्या ठिकाणी बोलावून सुरक्षित ताब्यात घेण्यात आले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पुढील तपासासाठी तिचा ताबा गडचांदूर पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आला.

या कारवाईमुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा उलगडा झाला असून, चंद्रपूर पोलिसांच्या समन्वयपूर्ण व सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे बेपत्ता अल्पवयीन मुलीचा सुरक्षित शोध घेण्यात यश आल्याने या कारवाईचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचा नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, पोलीस उपनिरीक्षक सुनील गौरकार, सफौ धनराज कारकाडे, पोहवा चेतन गज्जलवार, सतीश अवथरे,सुमित बरडे, उषा लेडांगे,चापोशी मिलिंद टेकाम यांनी केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos