स्वयंरोजगाराकरिता विशेष घटक योजना : १८ ते ५० वयोगटातील इच्छुकांनी संपर्क साधावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी भंडारा : संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजातील चांभार डोर, होलार, मोची या जातीतील समाजबांधवासाठी स्वयंरोजगाराकरिता सन २०२६-२७ या चालु वर्षात विशेष घटक योजना (रु. ५०,०००) व बिज भांडवल योजना (रु. ५०,००१ ते ५ लाख पर्यंत) या योजनांचे प्रयात आले असुन विशेष घटक योजनेमध्ये अनुदान रू. २५०००/- व बिज भांडवल योजनेमध्ये ५०,०००/- देण्यात येत आहे.
त्यासाठी वय वर्षे १८ ते ५० वयोगटातील इच्छुक व्यक्तीनी अधिक हितीसाठी संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, दुसरा माळा, सिव्हील लाईन, भंडारा येथील कार्यालयाशी संपर्क साधावा
News - Bhandara




Petrol Price




