सहकारातून समृद्धीचा संकल्प साकार करण्यासाठी शेतकरी गौरव दिन : इंजि. प्रमोद पिपरे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या पुढाकारातून सहकारातून समृद्धी या संकल्पनेअंतर्गत शेतकरी गौरव दिन निमित्त आयोजित कार्यक्रम गडचिरोली जिल्हा मत्स्य पालन सहकारी संस्थांचा संघ मर्या. गडचिरोली येथे उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या. पुणे, जिल्हा सहकारी बोर्ड गडचिरोली, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय सहकारी सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंजि. प्रमोदजी पिपरे संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या. पुणे तथा माजी सभापती नप गडचिरोली होते.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना इंजि. प्रमोदजी पिपरे यांनी सांगितले की, भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाने सहकारातून समृद्धी हा संकल्प देशभर राबवून सहकार क्षेत्राला नवी दिशा दिली आहे. या उपक्रमांतर्गत साजरा करण्यात येणारा शेतकरी गौरव दिन हा देशाच्या अन्नदात्या शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या योगदानाचा गौरव करण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.
ते पुढे म्हणाले की, सहकाराच्या बळावर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, आधुनिक शेतीला चालना देणे, मूल्यवर्धन, प्रक्रिया उद्योग, साठवणूक व बाजारपेठ उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. सहकारी संस्थांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवून ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी पुढाकार घ्यावा असेही ते म्हणाले.
इंजि. प्रमोदजी पिपरे यांनी आरोग्यदायी समाज, सक्षम सहकार आणि समृद्ध शेतकरी हे परस्परपूरक असल्याचे सांगत सहकार क्षेत्रातील सर्व घटकांनी लोकसहभागातून पारदर्शक, उत्तरदायी व विकासाभिमुख कार्य करण्याचे आवाहन केले. तसेच शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी आणि ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी सहकार चळवळ अधिक बळकट करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक हेमंत सौलाखे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था गडचिरोली होते तर प्रमुख अतिथी म्हणून निलेश भीमरतवार सहकार अधिकारी, प्रशांत गटकोजवार सांख्यिकी सहाय्यक, सुनील बावणे सभापती दि वाल्मिकी मत्स्यपालन सहकारी संस्था मर्यादित गडचिरोली, आर.जी. उसेंडी लिपीक, भास्कर वालको,विजय गेडाम, नरेश टिंगुसले, रोशन जराते, गोपीचंद गेडाम,सतीश टिंगूसले आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पि. व्ही.तलमले जिल्हा सहकारी विकास अधिकारी जिल्हा सहकारी बोर्ड गडचिरोली यांनी केले.
News - Gadchiroli




Petrol Price




