वाहनास उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक फलक बसविणे बंधनकारक जुलै पासुन होणार दंडात्मक कारवाई

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : १ एप्रिल २०१९ पुर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक फलक बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व इतर सर्व वाहनधारकांनी ३० जुन पर्यंत शासनाने अधिकृत केलेल्या संकेतस्थळावर नोंदणी करुन आपल्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक फलक लावून घ्यावा, अन्यथा १ जुलै पासुन दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची सर्व वाहनधारकांनी नोंद घ्यावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेढे यांनी कळविले आहे.
News - Wardha




Petrol Price




