गडचिरोली शोकमग्न : अमेय सुरेश सावकार पोरेड्डीवार यांचे आकस्मिक निधन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली शहराचे पहिले नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश सावकार पोरेड्डीवार यांचे सुपुत्र अमेय सुरेश सावकार पोरेड्डीवार (३५) यांचे आज (१६ जून) सकाळी ११ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे गडचिरोली शहरासह सामाजिक, राजकीय व व्यावसायिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
अमेय पोरेड्डीवार यांच्या निधनाची बातमी कळताच नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रुग्णालय व त्यांच्या निवासस्थानी मोठ्या संख्येने धाव घेतली. सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे.
त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी कठाणी नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील तसेच मोठा आप्तपरिवार आहे.
तरुण वयात झालेल्या या अकाली निधनामुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




