महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


१३ जून महत्वाच्या घटना

१८८१ : यू. एस. एस. जीनेट आर्क्टिक समुद्रात नष्ट.

१८८६ : कॅनडातील व्हॅनकूवर शहर आगीत बेचिराख.

१९३४ : व्हेनिसमध्ये अॅडॉल्फ हिटलर आणि बेनिटो मुसोलिनी यांची भेट.

१९५६ : पहिली युरोपियन चॅम्पियन कप फूटबॉल स्पर्धा रियल माद्रिदने जिंकली.

१९७८ : इस्त्रायली सैन्याने लेबनॉनमधुन माघार घेतली.

१९८३ : पायोनियर १० हे अंतराळयान सूर्यमाला सोडून जाणारी पहिली मानवनिर्मित वस्तू ठरली.

१९९७ : दक्षिण दिल्लीतील उपहार सिनेमागृहाला लागलेल्या आगीत ५९ जण मृत्युमुखी पडले, तर सुमारे १०० जण जखमी झाले.

२००० : स्पेन मधील माद्रिद येथे एकाच वेळी १५ स्पर्धकांविरुद्ध खेळताना ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याने बारा लढतीत विजय मिळविला.

२०१८ : फोक्सवॅगन - कंपनीला उत्सर्जन (Emission) घोटाळ्यासाठी एक अब्ज युरो (8190 करोड)चा दंड ठोठावण्यात आला आहे.

२००७ : अल अस्कारी मशिद, इराक येथे दुसऱ्यांदा बॉम्बस्फोट हल्ला झाला.

२००५ : मायकेल जॅक्सन यांना १९९३ मध्ये एका मुलाचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपातून दोषमुक्तता.

२००२ : अँटी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र करार या करारातून अमेरिकेची माघार.

१९४४ : दुसरे महायुद्ध - जर्मन फौजांनी वापरलेला पहिला फ्लाईंग बॉब लंडनवर आदळला.

१९४४ : दुसरे महायुद्ध - व्हिलर्स-बोकेजची लढाई: जर्मनीच्या मायकेल विटमन यांनी ब्रिटिश सेनेचे १४ रणगाडे, १५ ट्रक आणि २ अँटी-टॅंक गन्स उध्वस्त केल्या.

१९४४ : दुसरे महायुद्ध - जर्मनीने इंग्लंडवर पहिला V1 फ्लाइंग बॉम्ब हल्ला केला.

१३ जून जन्म

१८२२ : जर्मन रसायनशास्त्रज्ञ कार्ल श्मिट यांचा जन्म. (मृत्यू: २७ फेब्रुवारी १८९४)

१८३१ : प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनतो, असा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक गणितज्ञ जेम्सक्लार्क मॅक्सवेल यांचा जन्म. (मृत्यू: ५ नोव्हेंबर १८७९ – केम्ब्रिज, यु. के.)

१८७९ : कट्टर हिंदुत्त्ववादी आणि अभिनव भारत संघटनेचे संस्थापक गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर यांचा जन्म. (मृत्यू: १६ मार्च १९४५)

१९०५ : इंग्लंडचे क्रिकेटपटू कुमार श्री दुलीपसिंहजी यांचा जन्म., यांच्या स्मरणार्थ भारतात दुलीप ट्रॉफी खेळली जाते. (मृत्यू: ५ डिसेंबर १९५९ – मुंबई)

१९०९ : केरळचे मुख्यमंत्री व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते इ. एम. एस. नंबूद्रीपाद यांचा जन्म. (मृत्यू: १९ मार्च १९९८)

१९२३ : गीतकार, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रेम धवन यांचा जन्म. (मृत्यू: ७ मे २००१ – मुंबई)

१९३७ : द इंडिपेंडंट चे सहसंस्थापक आंद्रेस व्हिटॅम स्मिथ यांचा जन्म.

१९६५ : भारतीय क्रिकेटपटू मनिंदर सिंग यांचा जन्म.

१९९४ : भारतीय तिरंदाज पद्मश्री दीपिका कुमारी यांचा जन्म

१९६४ : भारतीय राजकारणी आणि कॅबिनेट मंत्री पीयूष गोयल यांचा जन्म

१९५४ : पोलंड देशाचे उपपंतप्रधान, शेतकरी आणि राजकारणी आंद्रेज लेपर यांचा जन्म (मृत्यू : ५ ऑगस्ट २०११)

१९५१ : मेक्सिकन कुस्ती प्रवर्तक, Lucha Libre AAA वर्ल्ड वाइडचे संस्थापक अँटोनियो पेना यांचा जन्म (मृत्यू : ५ ऑक्टोबर २००६)

१९२८ : अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक विजेते जॉन फोर्ब्स नॅश ज्युनियर यांचा जन्म (मृत्यू : २३ मे २०१५)

८२३ : पवित्र रोमन सम्राट चार्ल्स द बाल्ड यांचा जन्म (मृत्यू : ६ ऑक्टोबर ८७७)

१३ जून मृत्यू

१९६७ : भारतीय शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचे निधन. (जन्म: २ ऑक्टोबर १८९१)

१९६९ : विनोदी लेखक, नाटकाकर, कवी, पत्रकार, शिक्षणशास्त्रज्ञ, टीकाकार, प्रभावी वक्ता, राजकारणी केशवकुमार उर्फ प्रल्हाद केशव अत्रे यांचे निधन. (जन्म : १३ ऑगस्ट १८९८)

२०१२ : पाकिस्तानी गझल गायक मेहंदी हसन यांचे निधन. (जन्म: १८ जुलै १९२७)

२०१३ : ड्यूईश इंक. कंपनी चे संस्थापक डेव्हिड ड्यूईश यांचे निधन.

२०२२ : भारतीय धावपटू,आशियाई गेम्स सुवर्ण पदक विजेते हरी चंद यांचे निधन (जन्म: १ एप्रिल १९५३)

२०२२ : बंगाली कलाकार शुभोमय चटर्जी यांचे निधन

२०२० : भारतीय क्रिकेटपटू आणि क्रिकेट इतिहासकार वसंत नायसादराय रायजी यांचे निधन (जन्म: २६ जानेवारी १९२०)

१९६९ : अमेरिकन धार्मिक नेता, नेशन ऑफ गॉड्स अँड अर्थ्सचे संस्थापक क्लेरेन्स 13X यांचे निधन (जन्म: २२ फेब्रुवारी १९२८)

आणखी शोधारोजगार संधी





  Print






News - todayspecialdays




Related Photos