पेंढरी (कोके.) ग्रामपंचायत अंतर्गत गावात विविध कामाचे भूमिपूजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी (कोके) गावात नुकतेच ग्रामपंचायत पदाधिकारी व सरपंच तारा अरविंद राऊत यांचे शुभ हस्ते विविध कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
स्मशान भूमी पोच रस्ता करण्यासाठी सरपंच महोदया मार्फत पालक मंत्री मान. अशोकजी उईके यांच्या कडे वारंवार पत्र देऊन काम मंजूर करण्यास व निधी उपलब्ध करुन देण्यास माजी आमदार अतुल देशकर यांच्या प्रयत्नातून जनसुविधा योजनेतून काम मंजूर करून त्याचे भूमिपूजन करण्यात आले.
तसेच विद्यमान आमदार विजय वड्डेटीवार यांच्या प्रयत्नातून जनसुविधा योजनेतून ग्रामपंचायत भवन बांधकाम मंजूर करून त्या कामाचे सुद्धा भूमिपूजन करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत अंतर्गत १५ वा वित्त आयोगातून नाली बांधकाम निळकंठ सूर्यवंशी ते कुसुम मेश्राम याच्या घरापर्यंत कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला गावचे प्रतिष्ठित व्यक्ती चंद्रकांत शिंदे माजी प. स. सदस्य, माजी सभापती अरविंद राऊत व ग्रामपंचायत पदाधिकारी सदस्य दिवाकर चाचरकार, भक्तदास चौधरी, सचिन कराडे, गीता भैसारे, मंदा चौखे, रेखा आमडारे, नगीना आत्राम, ममता शेंडे कर्मचारी सचिन शेंडे, विकास कराडे आदी मान्यवर उपस्थित होते.
News - Chandrapur




Petrol Price




