महत्वाच्या बातम्या

  आजचे दिनविशेष


४ जून महत्वाच्या घटना

१६७४ : राज्याभिषेकापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्णतुला झाली. ब्रिटिश वकिलातीच्या मते त्यांचे वजन सुमारे ७३ किलो भरले.

१८७६ : ट्रान्सकाँटिनेन्टल एक्स्प्रेस रेल्वे अमेरिकेच्या दोन तीरांना जोडणारी ही रेल्वेची पहिली प्रवासी खेप होती.

१८७८ : ऑट्टोमन साम्राज्याने सायप्रस युनायटेड किंग्डमच्या हवाली केले.

१८९६ : हेन्री फोर्ड यांनी तयार केलेल्या पहिल्या मोटारीचे यशस्वी परीक्षण.

१९४४ : दुसरे महायुद्ध – दोस्त सैन्याने रोम जिंकले.

१९७० : टोंगाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.

१९७९ : घानामधे लष्करी उठाव.

१९९३ : आय.एन. एस. म्हैसूर या युद्धविनाशिकेचे जलावतरण.

१९९४ : वेस्टइंडिजच्या ब्रायन लाराचा ८ डावांत ७ शतकांचा नवा विक्रम.

१९९४ : गीतकार मजरुह सुलतानपुरी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

१९९७: इन्सॅट-२डी या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोऊरू येथून यशस्वी प्रक्षेपण झाले.

२००१ : नेपाळचा शेवटचा राजा ग्यानेंद्र राज्यपदावर.

२०२२ : केनिची होरी - वयाच्या ८३ व्या वर्षी पॅसिफिक महासागर ओलांडून एकट्याने प्रवास करणारे सर्वात वयस्कर व्यक्ती ठरले आहेत.

२०२२ : भारतातील उत्तर प्रदेशातील हापूर येथे केमिकल प्लांटमध्ये स्फोट होऊन त्यात ८ लोकांचे निधन तर १५ लोक जखमी.

२०२२ : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) दिल्लीतील संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विद्यार्थी कलश गुप्ता यांनी सर्वात मोठी कोडिंग स्पर्धा TCS CodeVita जिंकली.

२०१० : स्पेसएक्स फाल्कन ९ रॉकेट - पहिले उड्डाण.

१९९६ : क्लस्टर मिशन - एरियन ५ चे पहिले उड्डाण, आणि अंदाजे 37 सेकंदांनंतर त्याचा स्फोट झाला.

१९८९ : उफा ट्रेन आपत्ती - उफा, रशियाजवळ नैसर्गिक वायूच्या स्फोटात ५७५ लोकांचे निधन.

१९८८ : कझाकस्तानला हेक्सोजन घेऊन जाणाऱ्या रेल्वेत स्फोट झाला यात किमान ९१ लोकांचे निधन तर १५०० लोक जखमी.

१९४२ : दुसरे महायुद्ध - मिडवेची लढाई सुरू झाली.

१९१२ : अमेरिका - मॅसॅच्युसेट्स राज्य हे किमान वेतन निश्चित करणारेअमेरिकेतील पहिले राज्य बनले.

४ जून जन्म

१७३८ : इंग्लंडचा राजा जॉर्ज (तिसरा) यांचा जन्म. (मृत्यू: २९ जानेवारी १८२०)

१९०४ : भारतीय प्रकाशक, पर्यावरणवादी भगत पुराण सिंह यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट १९९२)

१९१० : होव्हर्क्राफ्ट चे शोधक ख्रिस्तोफर कॉकेरेल्म यांचा जन्म. (मृत्यू: १ जुन १९९९)

१९१५ : माली देशाचे पहिले अध्यक्ष मालिबो केएटा यांचा जन्म. (मृत्यू: १६ मे १९७७)

१९३६ : चित्रपट अभिनेत्री नूतन बहल यांचा जन्म. (मृत्यू: २१ फेब्रुवारी १९९१)

१९४६ : दाक्षिणात्य चित्रपटातील पार्श्वगायक पद्मश्री व पद्मभूषण एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांचा जन्म.

१९४७ : विनोदी अभिनेता अशोक सराफ यांचा जन्म.

१९७४ : भारतीय शेफ जॅकब सहाय्या कुमार अरुनी यांचा जन्म. (मृत्यू: ४ नोव्हेंबर २०१२)

१९७५ : अमेरिकन अभिनेत्री अँजेलिना जोली यांचा जन्म.

१९९० : भूतानची राणी जेत्सुनपेमा वांग्चुक यांचा जन्म.

१९५९ : भारतीय उद्योगपती आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे अध्यक्ष अनिल अंबानी यांचा जन्म

१९१६ : अमेरिकन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक रॉबर्ट एफ. फर्चगॉट यांचा जन्म (मृत्यू : १९ मे २००९)

१८७७ : जर्मन रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार हेनरिक ओटो वेलँड यांचा जन्म (मृत्यू : ५ ऑगस्ट १९५७)४ जून मृत्यू

४ जून मृत्यू

१९४७ : बौद्ध धर्माचे अभ्यासक पंडित धर्मानंद कोसंबी यांचे निधन. (जन्म: ९ ऑक्टोबर १८७६)

१९६२ : अमेरिकन निसर्गतज्ज्ञ चार्ल्स विल्यम बीब यांचे निधन.

१९९८ : इतिहासतज्ज्ञ डॉ.अश्विन दासगुप्ता यांचे निधन.

२०२२ : भारतीय राजकारणी, केरळचे आमदार प्रयार गोपालकृष्णन यांचे निधन (जन्म: २० सप्टेंबर १९४९)

२०२१ : स्विस रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार रिचर्ड आर. अर्न्स्ट यांचे निधन (जन्म: १४ ऑगस्ट १९३३)

२०२० : भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखकबासु चटर्जी यांचे निधन (जन्म: १० जानेवारी १९३०)

२००२ : पेरू देशाचे ८५वे राष्ट्रपती फर्नांडो बेलाउंडे टेरी यांचे निधन (जन्म: ७ ऑक्टोबर १९१२)





  Print






News - todayspecialdays




Related Photos