राजुरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई : दोन दुचाकी चोरीचे गुन्हे उघड, आरोपी अटकेत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : राजुरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दुचाकी चोरीच्या प्रकरणाचा यशस्वी छडा लावत एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून सुमारे ६० हजार रुपयांच्या दोन चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. उत्तम दत्तुजी चौधरी (वय ४५), रा. सोमनाथपुरा वॉर्ड, राजुरा, सध्या जवाहरनगर, राजुरा असे आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घोलीस स्टेशन राजुरा परिसरातील फिर्यादी अमोल विंगल ठेंगरे (रा. रामपूर) यांनी त्यांच्या मालकीची मोटारसायकल चोरीला गेल्याची तक्रार राजुरा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला. गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पथकाने संशयित आरोपी उत्तम वतुभशी चौधरी (वय ४५), रा. सोमनाथपुरा वॉर्ड, राजुरा, सध्या जवाहरनगर, राजुरा याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेल्या दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. त्यामध्ये एक काळ्या रंगाची स्प्लेंडर प्लस क्रं एमएच-३४ बीके-९१५२ अंदाजे किंमत ३० हजार रुपये तसेच एक काळ्या रंगाची हिरो होंडा पॅशन प्रो क्रं.एमएच-३४ एएल-७३४१ अंदाजे किंमत ३० हजार रुपये अशा एकूण ६० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक दिपक ठाकरे, सहाय्यक फौजदार किशोर तुमराम, पोलीस हवालदार विक्की निर्वाण, पोअं नरेश बोलगोडवार, सफीक शेख व मिलिंद जांभुळे यांनी केले.
News - Chandrapur




Petrol Price




