राजन्नापल्ली येथे ओडेवार समाजाकडून आ.डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांचा सत्कार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी/सिरोंचा:सिरोंचा तालुक्यातील आरडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या राजन्नापल्ली येथे ओडेवार समाजाच्या वतीने आ.डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी समाजाच्या विविध प्रश्नांबाबत तसेच परिसरातील विकासकामांसंदर्भात निवेदन सादर करण्यात आले.यावेळी उपस्थित नागरिकांनी गावातील विविध समस्यांकडे लक्ष वेधत विकासकामे तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. आ. डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी समाज बांधवांच्या अडचणी जाणून घेत संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले. तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.या प्रसंगी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवी वासेकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लुरी, नगरसेवक सतीश भोगे, रवी सुलतान,माजी उपसरपंच बापू रंगूवार, मल्लन्ना रंगू, मनोज रंगू, राजमल्लय्या रंगू, अशोक रंगू, महेंदर सदनपू, सुमन जककुला, वेंकन्ना रंगू, नागेश रंगू, कोम्मली पसूला, किस्टय्या येरोल्ला, चेवला मल्लन्ना यांच्यासह कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
News - Gadchiroli




Petrol Price




