महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


१४ मे महत्वाच्या घटना

१७९६: इंग्लंडच्या ग्लूस्टर परगण्यातील बर्कले येथील जेम्स फिलीप या आठ वर्षाच्या मुलाला जगातील पहिली देवीची लस टोचण्यात आली.

१९४०: दुसरे महायुद्ध – हॉलंडने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

१९५५: सोविएत रशिया, अल्बानिया, बल्गेरिया, झेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, पोलंड, रुमानिया आणि पूर्व जर्मनी या कम्युनिस्ट राष्ट्रांचा वीस वर्षांचा परस्पर संरक्षणासाठीचा वॉर्सा करार पोलंडमधील वॉर्सा येथे झाला.

१९६०: एअर इंडिया ची मुंबई – न्यूयॉर्क विमानसेवा सुरू झाली.

१९६३: कुवेतचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश.

१९६५: चीनने सकाळी साडे सात वाजता (भारतीय वेळ) आपल्या दुसर्‍या अणुबॉम्बचा यशस्वी स्फोट केला.

१९९७: देशातील आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला सहकारी साखर कारखान्याची साखर आयुक्त कार्यालयात सहकार कायदा कलम चारखाली नोंदणी झाली. इंदिरा गांधी भारतीय मिहिला विकास सहकारी साखर कारखाना असे त्याचे नाव आहे.

२०२२: भारताने गहू निर्यातीवर तात्काळ बंदी घातली. उष्णतेच्या लाटेमुळे उत्पादन अंदाजापेक्षा कमी झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

१९१३: रॉकफेलर फाउंडेशन - सुरवात.

१८८९: नॅशनल सोसायटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू चिल्ड्रन - लंडन सोसायटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू चिल्ड्रन (London SPCC) चे नामकरण होऊन नॅशनल सोसायटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू चिल्ड्रन ची स्थापना

१४ मे जन्म

१६५७: छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ११ मार्च १६८९)

१९०७: फील्ड मार्शल आणि पाकिस्तानचे दुसरे राष्ट्राध्यक्ष आयुब खान यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल १९७४)

१९०९: विनोदसम्राट, कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित वसंत शिंदे यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै १९९९)

१९२३: दिग्दर्शक मृणाल सेन यांचा जन्म.

१९२६: आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका डॉ. इंदुताई पटवर्धन यांचा जन्म. (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९९९)

१९८१: भारतीय संगणक शास्त्रज्ञ प्रणव मिस्त्री यांचा जन्म.

१९९०: फेसबुकचे सहसंस्थापक मार्क झकरबर्ग यांचा जन्म.

१९९८: रसना च्या जाहिरातीतील बालकलाकार तरुणी सचदेव यांचा जन्म. (मृत्यू: १४ मे २०१२)

१९८४: फेसबुकचे सहसंस्थापक मार्क झुकरबर्ग यांचा जन्म

१९२२: क्रोएशिया देशाचे पहिले अध्यक्ष फ्रांजो तुुममन यांचा जन्म (मृत्यू : १० डिसेंबर १९९९)

१८९८: मलावी देशाचे पहिले अध्यक्ष हेस्टिंग्ज बांदा यांचा जन्म (मृत्यू : २५ नोव्हेंबर १९९७)

१८६७: जर्मन पत्रकार आणि राजकारणी, बव्हेरियाचे मंत्री-अध्यक्ष कर्ट आयसनर यांचा जन्म (मृत्यू : २१ फेब्रुवारी १९१९)

१८६३: कॅनेडियन गणितज्ञ, फील्ड्स मेडलचे संस्थापक जॉन चार्ल्स फील्ड्स यांचा जन्म (मृत्यू : ९ ऑगस्ट १९३२)

१४ मे मृत्यू

१६४३: फ्रान्सचा राजा लुई (तेरावा) यांचे निधन. (जन्म: २७ सप्टेंबर १६०१)

१९२३: कायदेपंडित, समाजसुधारक सर नारायण गणेश चंदावरकर यांचे निधन. (जन्म: २ डिसेंबर १८५५ – होन्नावर, उत्तर कन्नडा, कर्नाटक)

१९६३: भाषाशास्त्रज्ञ, जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, घटनासमितीचे सदस्य, राज्यसभा खासदार डॉ. रघू वीरा यांचे मोटार अपघातात निधन झाले. (जन्म: ३० डिसेंबर१९०२)

१९७८: नाटककार व लेखक जगदीश चंद्र माथूर यांचे निधन. (जन्म: १६ जुलै १९१७)

१९९८: हॉलिवूड मधील अभिनेते व गायक फ्रँक सिनात्रा यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १९१५)

२०१२: रसनाच्या जाहिरातीतील बालकलाकार तरुणी सचदेव यांचे निधन. (जन्म: १४ मे १९९८)

२०१३: भारतीय लेखक असगर अली इंजिनिअर यांचे निधन. (जन्म: १० मार्च १९

२०२२: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्स यांचे निधन (जन्म: ९ जून १९७५)

२०२२: भारतीय-अमेरिकन LGBT कार्यकर्त्या, वकील आणि लेखिका उर्वशी वैद यांचे निधन (जन्म: ८ ऑक्टोबर १९५८)

२०२२: भारतीय राजकारणी, मध्यप्रदेशचे आमदार जगदंबा प्रसाद निगम यांचे निधन (जन्म: २० फेब्रुवारी १९२८)

१९९५: अमेरिकन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक ख्रिश्चन बी. अँफिनसेन यांचे निधन (जन्म: २६ मार्च १९१६)

१९४३: बेल्जियन वकील आणि लेखक - नोबेल पारितोषिक हेन्री ला फॉन्टेन यांचे निधन (जन्म: २२ एप्रिल १८५४)

१८७९: न्यूझीलंड देशाचे पहिले पंतप्रधान हेन्री सिवेल यांचे निधन (जन्म: ७ सप्टेंबर १८०७)





  Print






News - todayspecialdays




Related Photos