महत्वाच्या बातम्या

 भंडारा जिल्ह्यात कलम ३७ लागू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : १ मे,रोजी महाराष्ट्र दिन,बुध्द पोर्णिमा व ९ मे रोजी महाराणा प्रताप जयंती व १४ मे, रोजी संभाजी महाराज जयंत्ती साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) (३) लागू करण्यात आले आहे.

हा आदेश १ मे, २०२६ रोजी दुपारी १.०० वाजेपासून ते १५ मे, २०२६ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत लागू राहणार आहे. आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी शस्त्र बाळगणे, मिरवणुका, घोषणाबाजी, जमाव जमविणे यावर बंदी घालण्यात आली आहे.

अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी मनोहर चव्हाण यांनी हा आदेश जारी केला असून उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos