भंडारा : माटोरा येथे ५३ वर्षीय व्यक्तीची गळफास लावून आत्महत्या

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या माटोरा येथे एका ५३ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना २० एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली.
राजेंद्र सुखराम चव्हाण (५३, रा. माटोरा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २० एप्रिलच्या रात्री राजेंद्र चव्हाण यांनी स्वतःच्या घरात नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. घटनेच्या वेळी घरातील इतर सदस्यांना याची तत्काळ कल्पना आली नाही, मात्र मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार लक्षात आला.
या घटनेची माहिती त्यांचा मुलगा रोहित राजेंद्र चव्हाण (२८) यांनी तातडीने कारधा पोलीस ठाण्याला दिली. रोहितच्या तोंडी तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची (मर्ग) नोंद केली आहे. राजेंद्र चव्हाण यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
कारधा पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार टेंभुर्णे या घटनेचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे माटोरा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
News - Bhandara




Petrol Price




