गडचिरोलीत अभाविपचे झेप २०२६ व्यक्तिमत्व विकास शिबिर यशस्वीरीत्या पार पडले

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), गडचिरोलीच्या वतीने १८ एप्रिल २०२६ रोजी झेप २०२६ व्यक्तिमत्व विकास शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. या शिबिरात विद्यार्थ्यांसाठी विविध मार्गदर्शनपर सत्रांचे आयोजन करण्यात आले.
शिबिरात मुख्यतः दहावी व बारावीनंतर करिअर मार्गदर्शन, सायबर क्राईम आणि सोशल मीडिया अवेअरनेस, लीडरशिप सेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), टाइम मॅनेजमेंट आणि पॉझिटिव्ह थिंकिंग यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर सत्र घेतले गेले. या सत्रांतून विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासासाठी मार्गदर्शन आणि जीवन कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळाली.
कार्यक्रमाचे उद्घाटन महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. योगेश पाटील यांनी केले. प्रमुख उपस्थितींमध्ये गडचिरोली विभाग संघटन मंत्री राहुलजी श्यामकुवर, गडचिरोली नगराध्यक्ष प्रा. सुनिता साळवे, नगर मंत्री संकेत म्हस्के यांचा समावेश होता.
शिबिरात मार्गदर्शन देण्यासाठी विविध तज्ज्ञ उपस्थित होते. त्यामध्ये गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य सतिश चिचघरे, सिक्युरिटी महा. पोलिस देविकारा तामशेटवार, गडचिरोली विभाग प्रमुख प्रा. धर्मेंद्र मुनघाटे, जिल्हा प्रमुख प्रा. विकास चित्ते, जिल्हा संयोजक विकास बोदलकर, प्रांत कार्य समिती सदस्य दीक्षा पिंपरे आणि इतर कार्यकर्ते सहभागी झाले.
शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्वक सहभाग नोंदवला आणि विविध सत्रांतून त्यांनी नेतृत्वगुण, डिजिटल जागरूकता, वेळ व्यवस्थापन आणि सकारात्मक विचारसरणी यावर मार्गदर्शन घेतले. आयोजकांनी सांगितले की अशा प्रकारच्या शिबिरांमुळे विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासास मोठा पाठिंबा मिळतो.
शिबिर यशस्वीरीत्या पार पडल्याने गडचिरोलीतील तरुण पिढीला नवीन कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळाली असून, भविष्यातील करिअर आणि नेतृत्वक्षमतेसाठी ही शिबिरे महत्त्वाची ठरतील, असे आयोजकांनी सांगितले.
News - Gadchiroli




Petrol Price




