विष प्राशन केलेल्या १९ वर्षीय तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : भंडाऱ्यातील एका धक्कादायक घटनेत १९ वर्षीय तरुणी वैष्णवी विक्रम मारबते (रा. कांद्री) याने विषारी औषध प्राशन केल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना १४ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ७:५० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
वैष्णवीला त्वरित तुमसर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले, परंतु तिच्या गंभीर प्रकृतीमुळे तिचे जीवन वाचवता आले नाही. सध्या, वैष्णवीने विष प्राशन का केले, हे स्पष्ट झालेले नाही.
भंडारा पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मर्ग नोंदवला असून तपास पोलिस नायक टिचकुले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. पोलिस घटना घडण्यामागील कारणांचा शोध घेत आहेत तसेच संबंधित साक्षीदारांची माहिती गोळा करून पुढील कारवाई करतील.
या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, तरुणीच्या कुटुंबीयांना मोठा दु:खाचा धक्का बसला आहे.
News - Bhandara




Petrol Price




