महत्वाच्या बातम्या

 १२ एप्रिल रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम ८ ते १४ एप्रिल या कालावधीमध्ये साजरा करण्यात येत आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक सुस्थितीत असावा, त्यांचे आरोग्य चांगले राहावे या उद्देशाने नागपूर जिल्हयातील ज्येष्ठ नागरिकांकरीता आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन १२ एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या कालावधीत  सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर कार्यालयामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय आय. टी.आय. समोर, श्रध्दानंद पेठ, नागपूर येथे करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य शिबिराच्या उपस्थित राहून आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos