महत्वाच्या बातम्या

 गडचिरोलीत भटक्या श्वानांचा उपद्रव : नागरिकांची सुरक्षितता धोक्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : पोर्ला व परिसरात भटक्या श्वानांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रस्त्यावर श्वानांच्या झुंडी थांबून बसल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सामान्य नागरिकांसाठी घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.

यापूर्वी श्वानांनी हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक ग्रामपंचायतीकडे श्वानांचा नियंत्रण आणि बंदोबस्त करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos